Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi. या वेळचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय भव्य दिव्य असा झाला. मोठ्या संखेने उपस्थित असणाऱ्यांच्या साक्षीने यावेळचा हा पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. हा सोहळा काही गोड काही कडू आठवणी आपणाला देऊन गेला. या पुरस्काराचा भव्यदिव्यपणा मला या पुरस्काराबद्दल डीप मधे जाणून घ्यायला भाग पाडून गेला आणि मी याबद्दल माहिती धुंडाळू लागलो. यानंतर जे काही माझ्या हाती लागलं ते मी तुमच्या समोर मांडत आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे ही गोष्ट सर्वाना माहीत आहेच पण आजच्या या लेखात आपण या पुरस्कारसंबंधी काहीशी अधिक माहिती जाऊन घेणार आहोत.
Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi.
या पुरस्काराची सुरुवात म्हणाल तर १९९५ ला झाली पण १९९६ पासून हा पुरस्कार प्रत्यक्ष द्यायला सुरुवात झाली. १९९५ मधे सत्तेत असणाऱ्या भाजप शिवसेना या युती सरकारच्या काळात याची सुरुवात झाली. यासाठी एक समिति स्थापन केली जाते आणि ती समिति हा पुरस्कार कोणाला द्यायचा हे त्यासाठीच्या निकषावरून ठरवते.
Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi. |
कला, क्रीडा,आरोग्य,समाजसेवा,साहित्य,विज्ञान,पत्रकारिता,लोकप्रशासन हा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार अतिशय सन्मानपूर्वक प्रदान केला जातो. 'Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi.'
सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह,शाल आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुरुवातीला जेव्हा हा पुरस्कार सुरू झाला त्यावेळी ५ लाख रुपये एवढी धनराशी पुरस्कारप्राप्त व्यक्तीला दिली जात होती. पण वेळोवेळी यात वाढ होत गेली आणि आत्ताच्या घडीला ही रक्कम २५ लाख रुपये इतकी झाली आहे.
जसा धनराशी मधे बदल होत गेला,तसेच या पुरस्काराच्या निकषांमध्येही बदल होत गेले. २०१२ अगोदर केवळ मराठी व्यक्तीलाच हा पुरस्कार दिला जात होता,परंतु २०१२ ला यात काहीसा बदल करून परप्रांतीय व्यक्तींनाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो असा बदल केला गेला. परंतु त्या व्यक्तीने महाराष्ट्रात किमान १५ वर्षे तरी वास्तव्य केलेले असावे लागते. त्यासोबत त्याने महाराष्ट्रात वरील दिलेल्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली असावी असे नियम लागू करण्यात आले.
Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi.
सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. तेव्हा पासून आजपर्यंत व्यक्तिशा विचार करायला गेला तर २० जणांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. तर पुरस्करांच्या वर्षाचा विचार केला तर १८ वेळा हा पुरस्कार दिला गेला आहे
२००३ ला अभय बंग आणि राणी बंग यांना आणि २००८ साली नानासाहेब धर्माधिकारी आणि मंगेश पाडगावकर यांना हा पुरस्कार दिला आहे. यावरून दिसून येते की १८ वर्षात २० जणांना हा पुरस्कार दिला गेला आहे.Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi.
Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi. |
क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट शी संबंधित असणाऱ्या सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांनाही हा पुरस्कार दिला आहे.
महाराष्ट्र भुषण प्राप्त पहिली महिला म्हणून विचार केला गेला तर लता मंगेशकर यांचे हा पुरस्कार प्राप्त पहिली महिला म्हणून नाव घ्यावे लागते. त्यांना १९९७ साली हा पुरस्कार प्रदान केला गेला.
विज्ञानामधील कार्यासाठी विजय भटकर, जयंत नारळीकर,रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार प्राप्त बहिणी म्हणून लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे नाव घ्यावे लागेल.
लता मंगेशकर यांना १९९७ ला आणि आशा भोसले यांना २०२१ ला हा पुरस्कार मिळाला.
नानासाहेब धर्माधिकारी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी या पिता पुत्रांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi. |
Maharashtra Bhushan puraskar All Information.
आता आपण पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीची यादी पाहणार आहोत
पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि वर्ष.
१९९६ पु. ल. देशपांडे. साहित्य
१९९७ लता मंगेशकर. कला, संगीत
१९९९ विजय भटकर विज्ञान
२००० सुनील गावसकर क्रीडा
२००१ सचिन तेंडुलकर क्रीडा
२००२ भीमसेन जोशी कला, संगीत
२००३ अभय बंग आणि राणी बंग. समाजसेवा व आरोग्यसेवा
२००४ बाबा आमटे समाज सेवा
२००५ रघुनाथ माशेलकर. विज्ञान
२००६ रतन टाटा उद्योग
२००७ रा.कृ. पाटील समाजसेवा
२००८ नानासाहेब धर्माधिकारी. समाजसेवा
२००८ मंगेश पाडगावकर साहित्य
२००९ सुलोचना लाटकर कला, सिनेमा
२०१० जयंत नारळीकर विज्ञान
२०११ अनिल काकोडकर. विज्ञान
२०१५ बाबासाहेब पुरंदरे. साहित्य
२०२१ आशा भोसले कला, संगीत
२०२३ अप्पासाहेब धर्माधिकारी. समाजसेवा
"Maharashtra Bhushan puraskar All Information In Marathi."
हा लेख तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्र वर्गामध्ये जरूर शेअर करा.
0 Comments